आनंद पावसाचा
आनंद पावसाचा


कोकणातले घर सुरेख कौलारू
सुंदर हिरवाई बहरली पावसाने
लाल मातीचे समोर मस्त अंगण
पावसाचे थेंब झेलते मी हाताने.
श्रावणातल्या रिमझिम पाऊस धारा
चिंब भिजवुनी सुखवी मम मनाला
मनसोक्त भिजुनी घेते मी गोल गिरक्या
आणि अशावेळी आठवते मी साजणाला.
श्रावणातले सृष्टी सौंदर्य पहावे ते गावात
शेत शिवार डोंगर माथी सारी हिरवळ
रंगिबेरंगी फुलांचे सुंदर ताटवे माचवीवर
चारी बाजुनी भरलेला फुलांचा दरवळ.
आकर्षतो मज गाव माझा चिमुकला
लाल लाल मातीच्या रस्त्यावर खटारा
नाद बैलांच्या गळ्यातल्या घंटांचा
अजुनही कानी घुमुनी देतो मज सहारा.
भारतीय संस्कृती अन् सणांची सरबत्ती
आज पाहायला मिळते ती फक्त गावात
म्हणून श्रावण, भाद्रपद महिन्यात मी येते
हमखास माझ्या कोकणातल्या घरात.