STORYMIRROR

Trupti Naware

Others

4  

Trupti Naware

Others

आम्ही दोघं

आम्ही दोघं

1 min
27.5K


आम्ही दोघं....

एकाच धाग्याची

दोन टोकं

कधी न जुळणारी

कधी न मिळणारी

मध्ये माञ असंख्य गाठीची

साखळी असणारी

आम्ही दोघं....

एकाच धाग्याची

दोन टोकं

एक गाठ बांधीलकीची

एक गाठ व्यवहाराची

परस्परा स्पर्शून जाई

एकमेका सावरुन जाई

पण मधले अंतर तसेच राही

आम्ही दोघं....

एकाच धाग्याची

दोन टोकं

एका पाठोपाठ एक

खुप गाठी पडत गेल्या

एकमेकांच्या गुणदोषांस

पांघरूण घालत गेल्या

गाठी उकलण्यास

कुणा वेळही नाही

कारण संभ्रमात होती

त्यांच्या नात्याची वही

आम्ही दोघं...

एकाच धाग्याची

दोन टोकं

एक टोक विश्वासाचे

एक टोक मैञीचे

यापलीकडचे बंध

कधी जुळलेच नाही

दोनही टोकं मिळावया

कधी दुरावलेच नाही !!!


Rate this content
Log in