आले आले हो गणपती आले
आले आले हो गणपती आले
मराठी मंडळात गडबड झाली
मराठी मंडळात गडबड झाली
अहो काय गडबड झाली ते तर सांगाल का नाही!!
आले आले हो गणपती आले
आले आले हो गणपती आले
गणेश चतुर्थाचा शुभ दिन
गणेश चतुर्थीचा शुभ दिन
मराठी मंडळात गणपती आले
सर्वजण स्वागताला हो धावले
सर्वजण स्वागताला हो धावले
आधी पाय धुवून डोळ्याला पाणी लावले
नंतर प्रेमभरे औक्षण केले
प्रेssमभरे औक्षणs केले
मग स्थानपन्न गणपती झाले
स्थानापन्न गणपती झाले
स्थानापन्न गणपती झाले
नंतर कुंकूमतिलक लावूनी
माळावस्त्र एकशे आठचे घालूनी
दुर्वांची जुडी माथ्यावर ठेवूनी
जानव्यासी अंगावरी घालूनी
मोदक एकवीस अर्पियले
मोदक एकवीस
अर्पियले
जास्वंद केवडा काय घमघमाट
हार शेवंतीचा रंगीबेरंगी थाट
कमळाची फुले रंगीत सुशोभित
पंचखाद्यासी अर्पियले
पंचखाद्यासी आर्पियले
झगमगाट दिव्यांच्या माळांचा
रंगसंगती त्यात सुंदर साचा
कागदी फुले नि सुंदर माळा
गूळखोब-यासी अर्पियले
गूळखोब-यासी अर्पियले
चौदा विद्या चौसष्ट कलांचा
अधिपती आज मंडळात आला
नमन करिती जन आशिर्वादाला
खवा मावा मोदक अर्पियले
खवा मावा मोदक अर्पियले
बाप्पा तर आले धरेवरती
मागणे मागती भक्त तयांसी
सुखी ठेव देवा आम्हां सर्वांसी
रोगशत्रूला हटवावे
रोगशत्रूला हटवावे
आले आले हो गणपती आले
आले आले हो गणपती आले
आले आले हो गणपती आले