आला आला आला माझा गणराज आला
आला आला आला माझा गणराज आला


घेऊन मूषकाला दारी गणेश आला
आनंद केवढा हा माझ्या मनास झाला ॥धृ॥
हातात पाश त्याच्या संहारण्यास शत्रू
आणिक अंकुशाला घेऊन सज्ज झाला॥१॥
स्वीकार आरतीचा त्याने हसून केला
नैवेद्य मोदकाचा खाऊन तृप्त झाला॥२॥
ठेवून घेत लाडू मीही इथून नेतो
आरास खेळण्यांची पाहून तो म्हणाला॥३॥
पूजा कशी करावी जाणून काय घेऊ
आता दिसे मला तू सर्वत्र व्यापलेला॥४॥
देवा निमित्त आहे येणे तुझेच आता
माझ्या घरी सुखाचा हा पूर दाटलेला॥५॥
मुक्काम जाहलेला ऐसा दहा दिनांचा
आईस आठवूनी बाप्पा उदास झाला॥६॥
काही मला सुचेना राहा इथेच आता
हट्टास पेटलो मी तो शांत शांत झाला॥७॥
येईन रे पुन्हा मी सांगून तो निघाला
डोळे पुसून तोही घेता निरोप झाला॥८॥