आकाश
आकाश

1 min

245
निळसर आकाश
घेई लक्ष वेधून
सप्तरंगांची उधळण
दिसे इंद्रधनुतून
काळ्या काळ्या ढगांची
वर्णी लागे पावसाळ्यात
मेघगर्जनेने होई
मन कसे भयभीत
ताऱ्यांची मैफिल जमे
रात्रीच्या काळोखात
जणू भासे हितगुज
प्रकाशाच्या नृत्यात
पक्षी, विमान घेई
आकाशात उंच भरारी
दृश्य ते पाहूनी
मनही घेई नव्याने उभारी