आकांक्षा
आकांक्षा


काय हवे
आहे तुला
कळत नाही
प्रिया मला
जादू आहे
बोलण्यात तुझ्या
छाप पाडते
मनावर माझ्या
वाटते रोज
तुला भेटावे
मनभरून डोळ्यांत
साठवून घ्यावे
स्वप्नांच्या नगरीत
तुजसंग रहावे
थोडे हसावे
थोडे रडावे
असावा तुझा
हातामध्ये हात
आयुष्यभराची मिळावी
तुझी साथ