आजी
आजी


आजीला प्रिय
तिची नातवंडे
उत्साह तिचा
दांडगा गडे
संस्कारांची असते
ती खाण
चालत नाही
अजिबात घाण
आजीचा बटवा
घरात चाले
आजाराला दूर
पळवून लावे
पारंपारिक पदार्थ
करायची आवड
स्पर्धांमध्ये होते
अजूनही निवड
आईबरोबर कधीतरी
कुरकुर होते
मी नाही
बोलणार म्हणते
सगळे घालतात
मग समजूत
मानते तीही
ह्यातच हीत
आता आधुनिक
ती बनली
मोबाईल वापरायला
लगेच शिकली
नाटक सिनेमात
वेळ घालवते
भजनी मंडळात
अग्रेसर असते
खूप सारे
लाड पुरवते
आम्हाला ती
फार आवडते