आजही बसरलो
आजही बसरलो
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
53
आजही बरसतो
अचानक बरसणारा
तो पाऊस
तुझ्या आठवणीत
आजही बरसतो
ओठा खाली दबलेला
तो हुंदका
तुझ्या आठवणीत
आजही बरसतो
अवखळलेला शब्द
तो मनात
तुझ्या आठवणीत
आजही बरसतो
प्रत्यक्षात नाकारलेला
तो सहवास
तुझ्या आठवणीत
एकही दिवस असा नाही
जेव्हा मी बसरलो नाही
डोळ्यात साठवून ठेवले ते घाव
तुझ्या आठवणीत