आज अचानक संध्याकाळी...
आज अचानक संध्याकाळी...
1 min
11.7K
आज अचानक संध्याकाळी
ढग दाटून आले होते
भाव तुझे डोळ्यात माझ्या
साठून आले होते
दाटलेल्या त्या मेघांखाली
मी अलगद आलो होतो
आठवणींच्या ओघात तुझ्या
काहीसा गदगद झालो होतो
मेघांतून त्या तुजसाठी माझे
अश्रूच सांडत होते
परत तुला समोर पाहण्या
मन मजपाशी भांडत होते
जलथेंबात त्या चक्षू माझा
तुलाच पाहत होता
अन भाव तुझा मम अश्रूंमधूनी
पावसात वाहत होता
मेघमुक्त त्या नभी
तारे उनाड आले होते
तुजवीण आता दिनरात माझे
उजाड झाले होते उजाड झाले होते.