आईच्या छायेत
आईच्या छायेत
1 min
393
नको मज काही
आई तुझ्या विन
अमृताचा घडा
नाही तुझ्या विन
वात्सल्याचा झरा
वाही खळखळ
सुखाचा सागर
नाही तळमळ
मज नको काही
ठेव सर्व सुखी
आनंदे नांदती
नको व्यथा दुःखी
साधी ती राहणी
उच्च विचारांनी
नको अहंकार
दुरावा जीवनी
असावा सर्वथा
मदतीचा हाथ
नसाव्या अपेक्षा
सौभाग्याची साथ
सुखाचा तो धागा
मज गवसला
दुरितांची सेवा
विडा उचलला
आईच्या छायेत
सुखावली काया
नाही काही उणे
पदराची माया
