STORYMIRROR

Prashant Shinde

Others

2.7  

Prashant Shinde

Others

आईचा वाढदिवस..!

आईचा वाढदिवस..!

1 min
7.7K


आईचा वाढदिवस हा भाग्याचा

खऱ्या अर्थाने सौभाग्याचा

आपला सुखी चेहरा

आंनदी संसार,

पोटभर खाऊन पिवून सुखी असणं

हीच तिच्या साठी सर्वात मोठी शुभेच्छा

त्यामुळे

सूर्याला तेज काय दाखवणार..?

तसे आईला माया काय दाखवणार

तीच मायेचा महासागर

त्याची पूजा प्रार्थना या शुभ दिनी करणं

हेच मोठं भाग्य

वाढदिनाच्या दिवशी

आईला इतकंच सांगावं वाटत

आई तू आहेस ,म्हणून मी आहे

आई तू साक्षात शुभेच्छा आहेस

तुझे आशीर्वाद असेच राहोत

हीच तुझ्याच चरणी प्रार्थना....!



Rate this content
Log in