आई
आई
1 min
14K
आई तुझा गं
होतो नेहमी भास...
कोण भरवेल गं
मला प्रेमाने घास...
तुजविन आई मला
हे जग आहे परके...
आईविना मुल मी
वाटते गं पोरके...
हवी मला कुस
तुझी निजण्या गं...
भिरभिरते ही नजर
तुला शोधण्या गं...
आस पास तु
आहे मला वाटे...
जाते नजर जिथे
आई तु भेटे...
