STORYMIRROR

vishal lonari

Others

3  

vishal lonari

Others

आई

आई

1 min
26.8K


तुझ्याविषयी काय बोलू

तुझं वर्णन मी काय करू 

कोणती तुला देऊ उपमा

मला समजत नाही

आज मला तुझ्यापासून दूर

खरंच करमत नाही 

तुला डोळे भरुन पाहावंसं वाटतं

तुझ्या कुशीत मला शिरावंसं वाटतं

मात्र नाही करू शकत यापैकी काही

म्हणून डोळ्यात आसवांना जागा पुरत नाही

निजल्यावरही माझा हुंदका, मला आवरत  नाही 

रोज उठता टोचून घेतो मी बालपणीच्या आठव सुया

कंठ दाटून येता मिटल्या डोळ्यांना माझ्या जाणवते तुझी माया

तुझ्या विचारांसारखा दुजा मला मनमीत नाही

या, दुनियेच्या कडवट अनुभवांना आता भीत नाही 

तू माझ्या मनाचा गजर

पापणी उघडता तू डोळ्यात साठते

हृदयातून तेव्हा माझ्या रक्ताची

एक हळवीशी धार वाहते 

काव्याचा अंत हा खरा अंत असणार नाही

तुझ्याबद्दल लिहिताना लेखणी कधी थकणार नाही 

आई तुझ्याविषयी मी काय बोलू

तुझ्याबद्दल मी काय लिहू

तू नाहीस जिथे ते जग वाटते मला विखारी

खरं सांगून गेले, "स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी"

 


Rate this content
Log in