STORYMIRROR

Bhagyashri Chavan Patil

Others

4  

Bhagyashri Chavan Patil

Others

आई

आई

1 min
14

आई म्हणजे त्या मंदिराचा उंच असणारा कळस               

आई म्हणजे त्या दारातली पवित्र असणारी तुळस... 


आई म्हणजे माझ्या नात्यातला मायेचा अतुट ठेवा        

आई म्हणजे साक्षात भगवंतानी दिलेला सुखद मेवा...


आई म्हणजे माझ्या पहिल्या खऱ्या प्रेमाची सुरुवात

आई म्हणजे रोजच्या माझ्या जगण्याची मिळकत...


आई म्हणजे माझे विश्व व्यापून टाकणारी भावना

आई म्हणजे माझ्या यशाला मिळणारी गुरुदक्षिणा...


आई म्हणजे देव कारण तिने सांगावे आपण करावे

आई म्हणजे आदर तिच्या पुढे नेहमी नतमस्तक व्हावे...


आई म्हणजे माझ्या गोड गोड अश्या स्वप्नांची दुनिया

आई म्हणजे तू कधीही लांब जाऊ नको अशीच माझी माया...


Rate this content
Log in