आई
आई


आई
वात्सल्याची छाया
काळोखातील प्रकाश अन्
तेजस्वी चांदण्यांसम नितळ माया
आई
मायेचा पदर,
कुरवाळी जेव्हा लेकरा,
सुखाने भरून वाहे घागर
आई
म्हणजे परीस
होई सुवर्ण तयाचे
ज्याला लाभे तिचा सहवास
आई
ग्रीष्मामध्ये गारवा
सुकलेल्या वृक्ष, वेलींना
देई जगण्यास श्वास नवा
आई
पावसाची सर
भागे थेंबाने तहान
मृद्गंध राही तिचा जीवनभर