STORYMIRROR

Trupti Naware

Others

4  

Trupti Naware

Others

आई

आई

1 min
28K


आई तु तर...

वात्सल्यमुर्ती तु संस्कारमाती

तु घडविले तुझ्यातुन कणखर

हिरेमोती..

आई तु तर....

निरहंकारी प्रेमळसेवावृत्ती

तु शिकवीलीस तुझ्यातली पुण्याईची महती

आई तु तर...

निरपेक्ष प्रार्थना ,मंदीरातली शांती

तुझ्या कुशीत ग् मिळते

अनुभवाची संपत्ती

आई तु तर...

आधार,विश्वास,घरातली तु पणती

प्रकाशमयी संघर्षाची तु तर

अखंड ज्योती

आई तु तर....

उरातल्या गंधातली झालीस ग् शेवंती..तुझ्या विना बागेतली

फुलं ही कोमेजती

आई तु तर....

पहाट,वेदना,आनंदाची तु मुर्ती

तुझ्यातल्या शब्दांमुळे प्रेरक

होते भक्ती

आई तु तर...

सोशीक,अबोल,शांत समुद्राची भरती...रागात तुझ्या अनुराग बोलतो..

सदैव तु हसती

आई तु तर....

माया,सावली ...प्रोत्साहनाची शक्ती ..बळ तुझ्या त खंबीरतेचे

येऊ देत नाहीस तु विरक्ती

आई तु तर...

सार्थ ठरलीस कांता,तुज साष्टांग नमन करती

तु त्यागमुर्ती,जीवन खर्चीले तु

मुलांवरती..

आई तु तर....

अन्नपुर्णा,शारदा,महिषासुरमर्दिनी

ईश्वरआत्मा तुझ्यात दिसतो

तु तर ग् ञिमुर्ती..

आई तु तर...

साधी-सरळ ओळ काव्याची

तरी अपुर्ण ग पानावरती

अशी थोरवी तुझी अनंत

कशी करु ग् मी तृषेची तृप्ती !!!!!!


Rate this content
Log in