STORYMIRROR

vishal lonari

Others

2  

vishal lonari

Others

आई

आई

1 min
13.9K


आई म्हणजे निर्मळ माया

आई हीच जीवनाची छाया

आईचे ऋण न फिटणारे कधी

आईच माझे आभाळ नि धरणी

 

आईच कटीवरच्या करांचा विठोबा

आईच समशेर धरलेली खंडोबा

आईच जगदंब माझी

आईच असे ती नारायणी

 

आईच ठरते गुरु या जन्माची

श्रीकारांच्याही आधी पुजतो मी आई

आईसाठी भावनांचा दाटे उन्माळा

आईवीण मी जणू ठरतो पाचोळा

 

आई .... हा केवळ शब्द नाही

दैवतच असे

माझ्या आईच्या कुशीतच  

ढगांची उशी असे

 

आई प्रेमाचा सागर

जिचे कधी न सरत भरते

आई सदोदित मनावरी

वात्सल्याचा मेघ पाझरते ...


Rate this content
Log in