आई आणि बाई
आई आणि बाई
आई अन् बाई नाही ही अलग
एक नाण्याची असती जशी जुलग
आई तर ईश्वराची विभूती
बाई ही समाजाची जागृती
बाईत असती आईची माया
आईत असती बाईची काया
आईची ओजंळ जणु निर्मळ स्नेह
बाईची जाग जशी अस्तित्व नेह
जगदीश्वर अखिलेश्वर हे अखंड विश्व सारे
आई आणि बाई विना आहे अधुरे हे धन सारे
आई अन् बाई नाही ही अलग
एक नाण्याची असती जशी जुलग
आई तू कुटुंबाचा आधार
बाई तू शिक्षणाचा आगार
आई माय ममतेची माऊली
बाई दाय अधीरतेची बाहुली
आई ही तर आहे धरणी
बाई आहे धरणीवरची संजीवनी
आई शब्दात जागवते सात्विकपण
बाई शब्दात भरवले राजसीपण
आईचा पान्हा फुटतो आपल्या बाळासाठी
बाईचे अश्रू वाहते अब्रूचा बाणा राखण्यासाठी
आई अन् बाई नाही ही अलग
एक नाण्याची असती जशी जुलग
आई तुझ्या ह्रदयी जणू अमृत घडा
बाई तूझ्या मनी असतो प्रेम धडा
आई जन्म देऊन देतं, एक नवजीवन
बाई तू भरतेस नातेबंधात गोडवेपण
आईची शिकवण जशी संस्काराची पुंजी
बाईची शिकवण जणुं आधुनिकीकरणाची धुंदी
आई असते कुटुंबाचा आधारस्तंभ
बाई जगण्याची अधोरेखित दिप स्तंभ
आई आणि बाई विना नाही जीवन
यात कधी जाणवते अंतर तर, कधी अंतःकरण
आई अन् बाई नाही ही अलग
एक नाण्याची असती जशी जुलग.
