आगमन पावसाचे
आगमन पावसाचे
1 min
28K
ग्रीष्म तापला
अंगाची झाली काहीली
पावसाच्या आगमनाची
वाट पाहू लागली
आगमन पावसाचे होताच
तापलेली धरा तृप्त झाली
पावसाच्या सरीमध्ये
सगळीच नाचू लागली
आगमन पावसाचे
असते खूपच गरजेचे
त्यावरच अवलंबून असते
जीवन आहे मोलाचे
