आगगाडी
आगगाडी
1 min
28.8K
आगगाडी छान
निघाली थाटात.
डोंगराच्या मध्ये
धावते घाटात.
अवखळ जणू
ती अल्लड पोर.
डौलात चालते
जशी राणी थोर.
सोबतीला तिच्या
धबधबे ,झाडी.
प्रवाशांना मात्र
हवे तिथे सोडी.
झुक झुक करी
सोडी काळा धुर.
पटपट बसा
नेई दूर दूर.
