STORYMIRROR

MAHENDRA SONEWANE

Others

3  

MAHENDRA SONEWANE

Others

आदर्श गाव

आदर्श गाव

1 min
44


डोंगराच्या पायथ्याशी , 

गाव माझे वसले आहे । 

शेती आणि बाग आहे , 

त्याच्या जवळ नदी वाहे ॥ 


गावाच्या टोकावर ,

देवळात हनुमान विराजे ।

मधोमध शाळा आहे , 

ज्ञान प्रकाशून साजे ॥ 


गावाला जागवितो,

रोज वासुदेवाची सवारी । 

सजलेल्या अंगणात , 

रांगोळी दारोदारी ॥ 


शेतकऱ्यांचा हा गाव , 

प्रत्येकाघरी गायी बैल | 

घुंघराच्या आवाजात , 

येता जाता झुमे डैल ॥ 


दुध दही होते घरी , 

रोज विकतात शहरी । 

भाजीपाला मिळे ताजा , 

आनंदात वाजवी बासरी ॥ 


गावामध्ये पाटलांचा , 

मान करतात सर्वजण । 

प्रेमाने साजरे होते , 

सर्व उत्सव आणि सण ॥ 


Rate this content
Log in