STORYMIRROR

kishor chalakh

Others

1.0  

kishor chalakh

Others

आधुनिक शेती

आधुनिक शेती

1 min
1.5K


नांगराची जागा आता

ट्रँक्टरने घेतली

ग्रामीण भागात

आधुनिकता आली


माझा शेतकरी दादा

तंत्र वापरू लागला

साधनांच्या साहयाने

शेती करू लागला


आधुनिकतेनं दिली

शेतीची खात्री

श्रम आणि खर्चाला

बसू लागली कात्री


शासन मायबाप

आणतात नव्या योजना

मिटू लागली आता

शेतकऱ्यांची दैना


यंत्रतंत्राच्या मदतीने

शेती लागली फुलू

शेतकऱ्याचें अच्छे

दिन झाले चालू


आधुनिकतेच्या युगात

शेतीला आला जीव

हिरवाईने नटू लागली

शेतीची शिव


Rate this content
Log in