आधारवड
आधारवड
1 min
28.8K
कित्येक पिढ्यांचा कैवारी
जो होता एक आधारवड
पण पुरता उन्मळून गेलेला
तरीही आशा आहे की
त्याची खोलवर रुजलेली मुळं
तरारून पुन्हा येतील
आभाळमायेला साक्षी ठेवून
पारंब्या तुटलेला हा पितामह
आता जरी खचला असला
तरी शुष्क पानांनी शाकारलेलं
त्याचं जीर्ण खोड
जिद्दीनं जोडू पाहातं
जमिनीपासून आभाळकडे जाणारं
त्याच अगाध नातं.......
