आभार
आभार
1 min
32.2K
सत्काराने नम्र जाहलो
कधी वाकलो, कधी झुकलो
हे देणे अलोट प्रेमाचे
आता भार कशाला आभाराचे
पुरे झाले साज सोहळे
आनंदाचे पुरे डोहाळे
क्षण हे उत्सवाचे,
अल्प क्षणांचे
आता भार कशाला आभाराचे
सार्थकी लागो माझे जीवन
सत्काराने झालो पावन
चीज झाले कष्टांचे
आता भार कशाला आभाराचे
सुख स्वप्नांची सुंदर होडी
संसारातील वाढे गोडी
आता मजेत जगायचे
भार कशाला आभाराचे
