1/12/2018..!
1/12/2018..!
पहिली कविता
पहिल्या क्षणी
ही कविता मला सुचली
लिहिता लिहिता
कचकन जीभ चावली
विचारांचा प्रामाणिक पणा
तारण ठेऊन आजवरचे जीवन सरले
तेंव्हा कोठे
आजच्या दिनाचे भाग्य लाभले
पहिल्या दिवसाची
पहिली कविता
हेच मला प्रत्येक
वाढदिनी आवर्जून सांगते
बाबा रे प्रामाणिक पणातच
खरे सौभाग्य असते
आणि माझ्या आनंदी जीवनाची
पुन्हा वाटचाल सुरू होते
आणि हे पटते
प्रामाणिक पणामुळे
एक फायदा नक्की होतो
आठवणीत ठेवण्या सारखे
काही जीवनात उरत नाही
त्यामुळे जीवनात काही
कमी पडत नाही
सौख्य समाधान शांती
सदैव मनी विराजते
आणि
आनंदी जीवन आनंदात खुलते....!
