Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

#Non-Stop November : FanFiction Edition

SEE WINNERS

Share with friends

आपल्या प्रत्येकाचेच एखादे आवडते पुस्तक, एखादी आवडती व्यक्तिरेखा किंवा एखादा आवडता खेळाडू असतो, पण आपण त्यात हस्तक्षेप करु शकत नाही. मग तो हॅरी पॉटर किंवा अ‍ॅव्हेंजर्स असो वा सुपरमॅन किंवा क्रिश असो वा राज किंवा गीत इत्यादी. हॅरी पॉटरने हर्मिओनला संपवले असते तर किंवा पीटर पार्करला स्पायडरने चावले नसते तर, त्यांचे आयुष्य कसे असले असते?

फॅनफिक्शनच्या जगात, लेखक प्रसिद्ध व्यक्तीरेखांसह कथेला नवीन वळण देतात. तुम्ही तुमची सृजनशीलता फॅनफिक्शन लिहिण्याच्या माध्यमातून जगासमोर आणण्यास तयार आहात? कथेतील नाविन्यपूर्ण ट्विस्ट्स, तुम्ही जसे स्वप्न पाहिले असेल तसा कथेचा शेवट, तुमच्या आवडत्या नायकाचे नवीन गुण, दोन किंवा अधिक व्यक्तीरेखांना एकत्र आणून एक नवीनच कथा लिहिणे आणि बरेच काही!

स्टोरी मिरर सर्व चाहत्यांना नॉन स्टॉप नोव्हेंबर ः फॅन फिक्शन एडिशन स्पर्धेत भाग घेण्यासाठी, तुमच्या कल्पनाशक्तीला मोकळा श्वास घेण्यासाठी आणि तुमच्या आवडत्या व्यक्तीरेखेला घेऊन फॅनफिक्शन लिहिण्यासाठी आमंत्रित करत आहे.

फॅनफिक्शनमध्ये नेमके काय होते?

फॅनफिक्शन स्पर्धेत, पूर्वीच्याच कथेला, कथेतील व्यक्तीरेखा, पुस्तके, चित्रपट किंवा टीव्ही शोमधील व्यक्तीरेखांद्वारे सुरुवात करुन तुमच्या पद्धतीने नव्या रुपात सादर करणे वा कथेत हवे ते बदल करणे.

नियम :

  1. वरील फोटोत सर्व विषयांचा उल्लेख केलेला आहे. कृपया तारखेप्रमाणे संकल्पनाधारित लेखन करा.
  2. प्रत्येक कथा अद्वितीय असेल आणि मूळ कथानकासारखी नसेल, याची खात्री करा.
  3. शैलीप्रकारावर कोणतीही बंधने नाहीत.
  4. आपली साहित्यरचना केवळ स्पर्धेसाठीच्या लिंकद्वारेच सादर करावी.
  5. ईमेल किंवा हार्ड कॉपी किंवा स्पर्धेच्या लिंकशिवाय सादर केलेली साहित्यरचना प्रवेशास पात्र नाही.
  6. सहभागी स्पर्धकांनी आपली मूळ साहित्यरचना सादर करावी.
  7. तुम्ही सादर केलेल्या साहित्य रचनेच्या संख्येवर मर्यादा नाही.
  8. लेख/निबंध सादर करण्यास परवानगी नाही.
  9. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.
  10. स्पर्धेत प्रकाशित झालेल्या सर्वच साहित्यरचनेबाबतचे संपादकीय गुण आणि वाचकांच्या पसंती, किती जणांनी वाचले, किती टिप्पण्या व रेटिंग दिले, या आधारे विजेत्यांचा निर्णय घेतला जाईल. तसेच विजेत्याने सर्व प्रॉप्टवर लेखन केलेले असावे.
  11. तुम्हाला स्पर्धेत विजयी व्हायचे असल्यास प्रत्येक प्रॉम्प्टवर दररोज किमान एक कथा सादर करणे आवश्यक आहे.
  12. स्टोरी मिररचा निर्णय अंतिम आणि सर्व सहभागी स्पर्धकांना बंधनकारक असेल.

प्रकार:

कथा

भाषा :

इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, ओडिया आणि बंगाली यापैकी एका किंवा अधिक भाषांमध्ये साहित्य रचना सादर केली जाऊ शकते.

बक्षिसे

  1. ट्रॉफीबरोबरच प्रत्येक भाषेतील अव्वल विजेत्यांशी त्याचे/तिचे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी स्टोरी मिररबरोबर प्रकाशन करार केला जाईल.
  2. जो कोणी सहभागी स्पर्धक सर्वच 30 प्रॉम्प्टसाठी लेखन करेल, त्याचे ईबुक प्रकाशित केले जाईल, तसेच पुस्तक खरेदी करण्यासाठी 200 रु. किंमतीचे स्टोरी मिरर व्हाऊचर दिले जाईल.
  3. जो कोणी सहभागी स्पर्धक 15 ते 29 प्रॉम्प्टसाठी लेखन करेल, त्यांना पुस्तक खरेदी करण्यासाठी 100 रु. किंमतीचे स्टोरी मिरर व्हाऊचर मिळेल.
  4. प्रत्येक भाषेतील सर्वोत्कृष्ट कथांना मोफत पुस्तके भेट दिली जातील.
  5. सर्व स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र मिळेल.
  6. जो कोणी लेखक सलग 15 दिवस लेखन करेल, त्यांना लिटररी हाफ-मॅरेथॉन प्रमाणपत्तर मिळेल.
  7. जो कोणी लेखक सलग 30 दिवस लेखन करेल, त्यांना लिटररी मॅरेथॉन प्रमाणपत्र मिळेल.

पात्रता :

साहित्य रचना सादर करण्याचा कालावधी ः 1 नोव्हेंबर 2020 ते 2 डिसेंबर 2020

निकाल : डिसेंबर 2020

संपर्क:

ईमेल: neha@storymirror.com

फोन नंबर: +91 9372458287


Trending content
28 318