करू नकोस घाई!
करू नकोस घाई!
नाही माणसा...
नाही बघवत तुझे हे हाल
एवढे कष्ट तू
कमवण्यात घालवले असतेस ना,
तर हक्काचे असते महाल
केलीस तू घाई
मिळवण्यात तुझा मान
आता काय उपयोग गड्या
सगळ्यांना करून दान !
स्वतःच्या हक्कासाठी,
स्वातंत्र्यासाठी,फायद्यासाठी
केलास तू माज
आता कोणासाठी कोण नाही
देश बदलतोय आज !
स्वत:च्या सुखासाठी
स्वतःचीच पोट भरलीस
काळा पैसा निघाल्यावर
स्वतःचीच भूक मारलीस
आज उमजली खरी
ती किंमत पैशांची
काल होता राव
आता लायकी पण
नाही रंक म्हणून जगण्याची !
अजून वेळ गेली नाही
करू नकोस घाई
अथवा,
वेळ सुद्धा आपला नाही
कोणावाचून कोणी नाही
आयुष्य जाईल ते वाया!
-नागेश(ndd)