मी फुलपाखरु
मी फुलपाखरु
1 min
21K
मी जर झाले
फुलपाखरु
मजाच होईन
माझी सुरु।।धृ।।
रंगीत रंगीत
लाऊनी पंख
हलके हलके
करुनी अंग
फुलांवर येईन
फिरू फिरू ।।१।।
सोबती माझे
सुगंधी फुले
मागे माझ्या
पळती मुले
झटकन उडेन
लागता धरु।।२।।
उडून उडून
जेव्हा दमेल
आराम घ्याया
खाली बसेल
हळूच चालेन
मी तुरुतुरु।।३।।