STORYMIRROR

Manisha Vispute

Others

3  

Manisha Vispute

Others

शक्तीतत्वाची लाली

शक्तीतत्वाची लाली

1 min
191

रंगांचा उत्सव नवरात्रीत

नव्या रंगात देवी वावरते

सामान्य नारी रुपात

तेज तिचे लकाकते...


क्रांतीचा रंग लाल

क्रोध दिसे तांबड्यात

नायनाट करण्या वाईटाचा

रक्त उसळे नसानसात...


स्त्रीच्या सौभाग्याचे लेणे

शोभे टिळा कुंकवाचा

स्वरुप भासे विशाल

अनुभव आज्ञा चक्राचा...


कुंकूमार्चन अष्टमीला

सामर्थ्याचे वरदान

आदी शक्तीचे प्रतीक

लक्ष्मीमातेचा असे मान...


बळ मिळे धैर्याचे

गाजवी शौर्य रणात

शक्तीतत्वाची लाली

पसरे मनामनात...



Rate this content
Log in