परी
परी
1 min
140
एक छोटीशी परी
जन्मली माझ्या घरी।
हातपाय मऊमऊ नाजूक
दिसायला सुंदर भारी।
बोबडे बोल,
लागली बोलायला।
आईबाबा आता तिला
लागले समजायला।
हळूहळू टाकू लागली
पाऊले तिची नाजूक।
पळायला शिकली आता धडपडते
म्हणून मी होतो थोडा भावुक।
बोलता बोलता मोठी झाली आता
शाळेत तिला घातलं।
मला घ्यायला तूच ये बाबा
असा तिचा नेहमी हट्ट।
भर्रकन दिवस निघून गेले
शिक्षण झालं पूर्ण।
स्थळ सुरु झाले, जमले तिचे
काढला लग्नाचा मुहूर्त।
सुंदर परी माझी
पंख लावून उडाली।
आई बाबांना सोडून
एकटी रहायला ती शिकली।
