घेऊया वसा
घेऊया वसा
1 min
550
दिन पर्यावरणाचा
करू रोजच साजरा
नटवू वसुंधरा
हिरवाईने.
येता पावसाळा
करू रोपट्यांचे रोपण
संवर्धन ,संगोपन
पर्जन्यासाठी.
स्वच्छ ,साफ
करू परिसर सारा
रोगराईला थारा
नकोच.
टाळू प्लास्टिक
करू बचत पाण्याची
अनमोल धनाची
सदोदित.
घेऊया वसा
करू धरेचे जतन
नको प्रदूषण
हवेचे.