हे शरीर तुला अर्पण!
हे शरीर तुला अर्पण!
1 min
1.3K
तुझ्या हातानं
तुझ्या साथीनं
जन्म झाला मजला
हा तुझ्या स्पर्शानं
अंत झाला दात्याचा
हे शरीर तुला अर्पण!
झेलले ते वारे
सोसले ते गार
तुझ्या मुठीत
तुझ्या कुशीत
शांत झालं वादळ
हे शरीर तुला अर्पण!
माझे ते रंग
माझे ते गधं
पुसटले अश्रू
निसटले स्वप्न
मोकळे झाले दर्पण
हे शरीर तुला अर्पण!
जन्म झाला
अंत झाला
तुझ्या सुखात
तुझ्या दुःखात
आठवणी त्या
हरपून
हे शरीर तुला अर्पण!
तूच माय
तूच बाप
डाव मांडला
प्रवास संपला
शेवट तुझ्या हर्षान
हे शरीर तुला अर्पण!