माझा भारत देश महान
माझा भारत देश महान
सकल विश्वात माझा भारत देश महान
मी भारतीय याचा मला अभिमान.
राम कृष्णाने याच भूमीत जन्म घेऊन केले याला पवित्र
आपल्या माता पित्यांचे धन्य झाले ते सुपुत्र.
कृष्णाने मोहित केले ऐकवून वंशीची तान
सर्वांना दिले भगवद् गीतेचे ज्ञान.
बुद्धाने जगाला दिला संदेश प्रेम, शांततेचा
केला अवलंब अनेक योद्ध्यांनी त्यांच्या शांततेच्या मार्गाचा.
राणा प्रताप, शिवाजी महाराज आहेत भिनलेले नसानसात
स्मरणाने त्यांच्या वीज उतरते रक्तात आवेश भरतो मनामनात.
याच भूमीत त्वेषाने लढल्या शत्रूंशी रणरागिणी
राणी लक्ष्मीबाई, चांदबीबीच्या तलवारी तळपल्या रणांगणी.
सावित्रीबाईंच्या लेकी सरसावल्या पुढे हिमतीने
सर्व क्षेत्रे काबीज करत आपली नावे कोरली सुवर्ण अक्षराने.
लाल किल्ल्यावर फडकलेला तिरंगा आठवण देतो स्वातंत्र्याची
गुलामगिरीतून सुटका करण्यासाठी शहीद झालेल्या वीरांची.
आमटे, मदर टेरेसा यांनी जनसेवेचे बांधले कंकण
घरदार, सुख लाथाडले, झुगारले सारे बंधन.
भाभा, नारळीकर, अब्दुल कलाम या सारखे शास्त्रज्ञ अद्भुत
जगाला दाखवून दिली त्यांनी विज्ञान, परमाणु ची ताकद.
भारतानेच पटवून दिले जगाला शून्याचे महत्त्व
आपली संस्कृती, परंपरा याचे अख्ख्या जगाने मानले सत्व.
भारतात स्वागत असते सर्वांचे अतिथी देवो भव च्या परंपरेने
मात्र पाऊल पडता परक्यांचे वज्र बळाने दूर सारती त्वेषाने.
सीमेच्या रक्षणासाठी अष्टोप्रहर सैनिक असतात तत्पर
या भूमीच्या इंचाइंचाला मानतात ते आपली धरोहर.
विविधतेत एकतेने न्हाऊन निघाला हा देश
नाना जाती-धर्म, रंगरूप असले जरी कितीही वेश.
कोरोनाच्या प्रहाराने सारे देश झाले हतबल
भारताने मात्र दाखवला विचार, संयम, धैसर्य, बळ.
लसीच्या शोधात मागे पडले सगळे पुढारलेले, प्रगत देश
स्वदेशी लसीने मारली बाजी, सरस,जीवदायी ठरला माझा देश
कुठे सापडेल जगात असा देश महान
म्हणूनच तो माझा भारत व मी भारतीय याचा मला अभिमान.
