थोरवी
थोरवी
1 min
2.9K
गाते थोरवी मी
आभाळाची माया
देते भरूनिया
पाणी अन छाया ।।
सूर्यचंद्र नभी
पाहे सृष्टीवरी
भेदभाव नसे
भेट उराउरी ।।
निसर्गाची किती
गावी ही थोरवी
वेळोवेळी करी
कृपा आम्हावरी ।।
जीवनाची वाट
सोपी ना कधी ही
आईबाबा साथ
मिळे ममता ही ।।
सैन्य बळ भारी
दक्ष सीमेवरी
जगतोया आम्ही
त्यांच्या जीवावरी ।।
सावित्री बाईने
पार केला घाट
शिक्षण घेण्यास
खुली केली वाट ।।
थोरवी गाण्याला
शब्द हे अपुरे
जन्माचे सार्थक
कार्याने जो करे ।।