STORYMIRROR

Jasmin Joglekar

Others

4  

Jasmin Joglekar

Others

रम्य सोहळे

रम्य सोहळे

1 min
662

गर्भरेशमी अरण्यातली वाट मनोहर सजली होती

निळी जांभळी फुले उमलली स्वर्गासम ती भासत होती

शाल धुक्याची मृदू मुलायम धरतीवरती पसरत होती

देवलोकची जणू अप्सरा शीत धरेला लिपटत होती


तृणपात्यावर दवबिंदूंची माला चमचम चमकत होती

नभामागुनी त्यात भरीला रविकिरणांची जादू होती 

मीलन होता रवी धरेचे शाल हळू ती विखरत होती

भान हरपुनी बघता सारे सृष्टी सलज्ज हासत होती


चिमण्या चोचीमधले चिवचिव ऐकत तरुही जागत होती

वेलींवरती फुले उमलता धरा सुगंधित झाली होती

मधू वेचण्या सुमनांवरचा भ्रमरांचीही भिरभिर होती

किमया सारी नयनरम्य ही दृष्टीपुढती बहरत होती


नसे स्वप्न हे खरेच सारे वसुंधरेवर विलसत होते

चित्रकार ते रंगच अलगद कुंचल्यातुनी शिंपित होते

नव्या ऋतूंचे नवे सोहळे गोंडस लोभस वाटत होते

निसर्गातले प्रसन्न क्षण हे मनास गंधित मोहित होते 


साहित्याला गुण द्या
लॉग इन