गुरु महेश्वर
गुरु महेश्वर
गुरू महेश्वर सगुण सर्वेश्वर
देई जीवनाला आकार
चंद्र सुर्यही गाती महती
गुरूविण नसतो आधार।।
असतो गुरु शिष्यांचा
ज्ञानरूपी वाहता झरा
जीवनात येतो विश्वास
उंच भरारी घेण्या खरा।।
गुरू रूप चित्ती राहो
ओंकार स्वरूप अवतार
देतो जीवनाला आकार
सगुण रूपी तो साक्षात्कार।।
सुशुप्तीत असो की असो
जागृत अवस्थेत निराकार
भ्रमित मन निर्गुण होतसे
पळे तिमिर कुविचार।।
सुविद्य कलेला सार्थकी
निसर्ग, आई, गुरू असे
करे सदोदित आविष्कार
प्रयत्न अखंड करती अपार।।
गुरूविण नाही परिपक्वता
असतो तो जगी निराधार
रडता पडता कोठे अडता
देती गुरू छाया अपरंपार।।