सोपं नसतं शिक्षिका होणं
सोपं नसतं शिक्षिका होणं
1 min
197
घरच सगळं आवरून
शाळेत शिकवायला येणं ।
शाळेत येऊन मुलांची
बडबड ऐकून घेणं।
आई ओरडते घरी
आरडाओरडा केल्यावर।
बाई तुम्ही किती शांत असता
दंगा आम्ही केल्यावर।
सगळ्यांच्या आई वडिलांशी
प्रेमाने तुम्ही बोलता।
कितीही त्रास झाला तरी
कधी कुठे कोणाला सांगता।
लेखणी असते हातात तुमच्या
शिकवायचं असत विद्यार्थ्यांना।
पंखात त्याच्या बळ देऊन
बघायच असतं तुम्हाला त्यांना उंच उंच उडतांना।
खरच बाई तुमचे आम्ही
किती मानु आभार।
सोपं नसत शिक्षिका होणं अन
लावणं घराला हातभार।
