कविता
कविता
संस्कार संस्कृती भारताची
जीकडे तिकडे अभिमानाने नांदती
संस्कृतीच्या या पाउलखुणा
पराक्रमाचा इतिहास लल्लाटी........
रुढी-परंपरा-सण-उत्सव, उत्कर्ष
घडे सदाचार संतसंग जनामनात
जन-गण-मनाचा जयघोष सदा
मायभूमिची सहिष्णुता बान्यात.....
सर्व-धर्म-समभाव सदा राहती
इतर संप्रदायांची ही इथे वस्ती
अनेक धर्म-भाषा-बोली विभिन्न
म्हणे वंदेमातरंम् इथे प्रत्येक व्यक्ती.......
ग्रंथ-ग्रंथालय-तत्वज्ञान-परीसंवाद
प्राचीन लेण्या-कलाकृती कारागीरी
स्वर्ग दिसे अनुपम अमुुची ही धरती
खाण-पान व्यंजने आहे इथे परोपरी.......
होवून गेले इथे महासंत नाना विभूती
सिनेसृष्टीचे कलाकार जीवंत स्वर्गनगरी
भांगडा-गुजराती-महाराष्ट्राची लावनी
तोड नसे कुठे ही गीतगायनात ही माधुरी......
शूरवीर बलिदान हंसुनी इथे झेली
निधड्या छातीवर गोळ्या देशासाठी
रांत्रदिवस इथे करती साहित्याचे-दान
सोसुन हाल अपेष्ठा जगती मानासाठी......