येरे येरे पावसा
येरे येरे पावसा
1 min
676
येरे येरे पावसा
लावू नको वाट
येऊन जा एकदा
फिरवू नको पाठ
येरे येरे पावसा
त्रास नको देऊ
पिकले तरच मला
मिळेल ना खाऊ
येरे येरे पावसा
तुला बोलावू किती
थकले रे डोळे
झोप येईना राती
येरे येरे पावसा
शेत झाली कोरडी
पडला नाही तर
कशी चालेल गाडी
येरे येरे पावसा
तुच सखा माझा
तुझ्या येण्याने
होतो मी राजा