स्त्रीचा प्रवास
स्त्रीचा प्रवास
मुलगी झाली म्हणून
तिचा खडतर प्रवास।
नाक,डोळे मुरडून तिच्या
आयुष्याची होते सुरुवात।
माहेरी वागते समजदारीने
शिक्षण करते पूर्ण।
सासरी गेल्यावर मात्र
संसाराचा गाडा सांभाळते सर्व।
काटकसर करत करत
घराला घरपण आणते।
स्वतःचे मन मारत,
सर्वाना आनंदाने सांभाळते।
लेकराबाळाची काळजी करते
संकटाला हिमतीने तोंड देते।
आयुष्य जाते कष्टात तिचे
स्वतःसाठी जगणे राहून जाते।
थोडी गाडी रुळावर येते
तेंव्हा दुखणे होतात सुरु।
हिमतीने तरी उभी असते ती,
सहनशीलतेच्या कौतूक तीच किती मी करू।
असाच प्रवास तिचा
आयुष्यभर चालत राहतो।
माय, माऊलीच्या आयुष्यात,
सांगाना? देव एवढे बळ कुठून देतो।
