STORYMIRROR

Gaurav Daware

Children Stories Children

3  

Gaurav Daware

Children Stories Children

हक्काचा वाढदिवस...

हक्काचा वाढदिवस...

1 min
251

वाढदिवस खरंच असतो मजेदार

कारण भेट देतात मित्र पुन्हा वारंवार

थोडा खर्चिक थोडा असतो दावेदार

पण वाढदिवसच बनवतो व्यक्तीला साक्षीदार


साक्ष देऊन बनवतो मित्रांना भागीदार

काही ओळखीचे तर काही अलगत उधार

त्या एक दिवशी असते थोडी मजा जोरदार

कारण नातेवाईक आणतात गिफ्ट दोन चार


इथे व्यक्तीची ओळख जागवते शानदार

नवीन मित्र बनतात करून गुणाकार

त्या दिवशी आयुष्यातल वर्ष उलटत अलवार

पण थकवा घालून देतात मित्र थोडे फार


वाढदिवस खरंतर निमित्त अलंकार

एकटे नाही आपण याची जाणीव अवसार

थोडे फुकट होते पण मित्र होते दोन चार

त्यांनाही आनंदी पाहून मन होत धारदार


खरच वाढदिवस घेऊन येतो आनंद अलवार

भेटीपेक्षा मन इथे जुळतात मस्त धुवाधार

क्षणासाठीच पण किम्मत येते आपलीही थोडीफार

आणि हाच आनंद संपवतो जीवनाचा थोडा भार.


Rate this content
Log in