ममता
ममता
1 min
2.6K
झाड काटेरी
उभे थाटात एक
फांद्या अनेक............१
फांदीशी हाले
खोपा घट्ट विणीचा
सुगरणीचा..............२
त्यात राहती
चिमुकलीच बाळे
करिती चाळे.............३
माय बोलते,
'घरट्यातच बस
आणिते घास'............४
बाळ खट्याळ
पाहते डोकावून
घरट्यातून..............५
आईचे मन
ममता तिच्या उरी
पक्षीण जरी...........६
थांबून जरा
पिल्ला घाली घरात
उडे जोरात............७