।। अभंग ।।
।। अभंग ।।
1 min
13.6K
लागलीया आस । पांडुरंग भेटी
वैष्णवांची दाटी । पंढरीशी
कपाळी चंदन । विणेसी वंदन
टाळी ब्रम्हानंद । लागलिया
भक्तीभाव मनी । पायी चाले ओढी
मुखी नाम गोडी । हरीनाम
भगवी पताका । लहरे गगनी
घाट तो हिंगणी । मोहरला
पावसाची सर । सुखद गारवा
घुमला पारवा । अंतरंगी
अंबारी पादुका । संत ज्ञानेश्वर
चालला ईश्वर । माहेरासी
टाळमृदंग हाती । धरूनिया लय
आता नाही भय । जनार्दना
जाईन पंढरी । पाहीन सोहळा
विठ्ठल सावळा । आवडीने