सोसेल का हा तुला,दुरावा?
सोसेल का हा तुला,दुरावा?
1 min
1.0K
अंतर माझ्यात ठेवूनी!
एकटेच मला सोडूनी,
मनाला या अडकवुनि
सोसेल का हा तुला
दुरावा!
रातभर मला आठवूनी
दिवसा लागून चाहुली
स्वतःला दोष देऊनी
सोसेल का हा तुला,
दुरावा!
आवाजात मन
तृप्त होउनी,
भासात मला हरवूनी,
अंत स्वतःचा पाहुनी,
सोसेल का हा तुला,
दुरावा!
स्वप्न अधुरे राहुनी
शेवट माझा होउनी,
आकांक्षा आता सोडूनि,
सोसेल का हा तुला,
दुरावा?
-नागेश(ndd)