STORYMIRROR

Pratibha Bilgi

Others

4  

Pratibha Bilgi

Others

इंद्रधनुष्य

इंद्रधनुष्य

1 min
1.6K

 

हा ओलावा मन भिजवूनी गेला

पुन्हा स्वप्नांना पंख देवूनी गेला

पावसाच्या सरींत जादू अशी काय ती

हळूच तुझ्या नावाची आठवण करवूनी गेला


ओल्याचिंब हृदयाचा ठाव घेवूनी गेला

शांत मनाला बेचैनीचा स्पर्श जाणवूनी गेला

थंड वाहणाऱ्या वाऱ्यात मोहकता अशी काय ती

न कळवता गुपचूप बहकवूनी गेला


तुझ्या माझ्यातील अंतर संपवूनी गेला

मौन झालेल्या भावनांना जागवूनी गेला

कुजबुजणाऱ्या पक्षांच्या गलकेत बात अशी काय ती

नीरस बनलेल्या आयुष्यात रस दुंबवूनी गेला


नजरेचा दृष्टिकोन बदलवूनी गेला

निराशेत आशा फुलवूनी गेला

कडकडणाऱ्या विजेत चमक अशी काय ती

अंधाऱ्या या जीवनात प्रकाश भरवूनी गेला


चिंतेचे सावट मिटले दुनिया सजवूनी गेला

सहज रीतीने प्रितिचा पाठ पढवूनी गेला

इंद्रधनुष्याच्या सौंदर्यात नजाकत अशी काय ती

रंगबिरंगी सुंदर रंग मुक्त उधळवूनी गेला 



Rate this content
Log in