STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

सुंदर परी

सुंदर परी

1 min
200

माझ्या घरी आहे

सुंदर माझी परी।

प्रत्येकाची काळजी तिला

सगळ्यांना समजून घेणारी।


दिसायला सुंदर आहे

सुंदर तिचे विचार।

स्वर्गातून उतरली जशी

स्वप्न झाले साकार।


संकटात सोबत 

माझ्या नेहमी असते।

हसरा चेहरा तिचा

कधीच उदास नसते।


हक्काने रागवत असते

चुकले तर मला।

स्वतः चुकली तर म्हणते,

माफ कर मला।


नात्यांची वीण ती

नेहमी जपते।

सुंदर परीमुळेच माझ्या

घराला घरपण असते।


Rate this content
Log in