भाषिक कोडे
भाषिक कोडे
1 min
432
मी आहे सजीव
तीनच अक्षरांचा
म्हणती सारे मला
मित्र शेतकऱ्यांचा
राहतो मी नेहमी
ओलसर मातीत
लांब शरीर माझे
आहे वलयांकित
भुसभुशीत खुप
करतो जमिनीला
उन्हापासून मात्र
वाचवा बरं मला
जैविक पदार्थांची
बनवितो माती
माझेच वर्णन मी
करू आता किती?
उभयलिंगी मी
सरपटत चालतो
बघू आता कोण
नाव माझे सांगतो?