रोज मरे, त्यास कोण रडे!
रोज मरे, त्यास कोण रडे!
1 min
1.1K
भूक मारुनी कोण जगे,
विश्वास ठेवाया कोण खरे,
दारिद्रयांशी मिळे स्वप्नतुरे,
श्रीमंतीला श्रीमंती ठरे,
रोज मरे,
त्यास कोण रडे!
स्वप्नांत दिसती चंद्रतारे,
आयुष्याची तुटती धागेदोरे,
खेळखेळती मनाजोगे,
समोर पडती शब्दकोडे,
रोज मरे
त्यास कोण रडे
सुख भेटूनीया कोण साजे,
दुःखास राहती कोण मागे,
संसाराला लागुनिया टाके,
दुनिया हसती कोण लाजे,
रोज मरे,
त्यास कोण रडे
आयुष्यात कोसळती गारे,
उपाशी अंगणात वाजती दारे,
भीतीस अंगाशी उठती शहारे,
कंटाळुनी हा खेळ सारे,
रोज मरे
त्यास कोण रडे