STORYMIRROR

Shila Ambhure

Others

2.1  

Shila Ambhure

Others

माझा दादा

माझा दादा

1 min
3.1K




दादा माझा गुणी

माझ्यासाठी खास।।धृ।।


कधी कधी उगा

चिडवितो मला

केसही ओढून

रडवितो मला

रुसले जर मी

म्हणे मला हास।।1।।


चॉकलेट, गोळ्या

बिस्किटांचा खाऊ

मीठे मीठे पेरू

देतो मला भाऊ

भरवितो मला

गोड गोड घास।।2।।


पैसे जमवुनि

भेटवस्तू घेतो

रक्षाबंधनाला

सकाळीच देतो

बर्थडेला मिळे

फ्रॉकही झकास।।3।।


कधी कधी दादा

जातो ना गावाला

नसते माझ्याशी

कोणी खेळायला

सारीकडे होतो

दादाचाच भास।।4।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन