छंद
छंद
समाजसेवा करावी
होते कैक दिन मनात
आता करते समाजसेवा
मान मिळवते कैक जनात....
छंद माझा वेगळा जरा
अनाथांना मदत करण्याचा
वृद्धाश्रमात जावून त्यांची
भावनिकता जपण्याचा....
लहान मुलांमधे रमण्याचा
छंद जपतेय मनापासून
शाळेतील सर्व मुले माझीच
ब्रीद जाणते आधीपासून....
लहानांना जपावे
मोठ्यांना सांभाळून घ्यावे
संकट समयी कामी यावे
विविध छंद सदा जोपासावे...
निसर्गात रमण्याचा
वृक्षांशी संवाद साधण्याचा
छंद माझा निराळा जरा
निसर्गाशी नाते जपण्याचा....
पाखरांची किलबील ऐकते
मनी खूप ,खूप सुखावते
सागर लाटांच्या सान्निध्यात
एकटीला मनसोक्त झोकून देते...
